
बी.डी.डी. चाळीतील मृत गाळेधारकांच्या वारसदारांना वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी गैरसोय आणि फसवणूक टाळण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी वारसदारांसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून वारस प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि वारसदारांचा मनस्ताप टळेल.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले की, “बी.डी.डी. चाळीतील मूत्त गाळेधारकांच्या वारसदारांना वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, पामुळे वारसदारांची बरीच गैरसोय होत आहे, तसेच बऱ्याचदा त्यांची फसवणूक ही होत आहे. सद्यस्थितीत बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास महाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असून, या पार्श्वभूमीवर, उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत एक धोरण तयार करावे, जेणेकरून मृत गाळेधारकांच्या चारसांना वारस प्रमाणपत्रासाठी मनस्ताप होणार नाही.
पत्रात ते पुढे म्हणाले की, “म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकृत ‘एक खिडकी योजना’ सुरू केली जावी. या योजनेअंतर्गत, वारसदारांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुविधा मिळेल, ज्यामुळे त्यांची गैरसोय दूर होईल. या विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी”
बी.डी.डी.चाळीतील मृत गाळेधारकांच्या वारसदारांना वारसा प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, त्यांची गैरसोय दूर व्हावी; ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सन्मा.शिवेंद्रराजे भोसले जी ह्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. pic.twitter.com/v2PXEs7bsM
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 17, 2025





























































