कुलाब्याच्या सोशल सिर्व्हीस हॉटेलात आग; किचनमध्ये शॉर्ट सर्किट, दोघे किरकोळ जखमी

कुलाब्याच्या सोशल सिर्व्हीस हॉटेलात संध्याकाळच्या सुमारास आग लागली. हॉटेलच्या किचनमध्ये आगीचा भडका उडाला. त्यात दोघे किरकोळ जखमी झाले. दोघांनाही प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते.

ताज महाल हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या बोमण बेहराम मार्गावर सोशल सर्व्हिस हॉटेल आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या किचनमध्ये आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान, कुलाबा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.  त्यानंतर काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत सुनील सिंग (28) आणि सुब्रत बराच (35) हे दोघे किरकोळ जखमी झाले. दोघांनाही सेंट जॉर्ज इस्पितळात नेण्यात आले. हॉटेलच्या किचनच्या चिमणीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येते.