Mumbai News – स्कूटर पार्किंगवरून धारावीत रक्तरंजित थरार, मित्राकडून मित्राची क्रूर हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कूटर पार्किंगच्या वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली. याप्रकरणी धारावी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आशिक खान असे अटक केलेल्या आरोपीचे तर अश्विन नादर असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटर पार्किंगवरून आशिक आणि अश्विन या दोघांमध्ये वाद झाला होता. काही वेळात वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. आशिकने अश्विनला बेदम मारहाण केली. यात अश्विन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचारादरम्यान अश्विनचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.