शिवसैनिकांच्या प्रयत्नांमुळे बेपत्ता मुलाचा शोध

हैदराबाद येथून मुंबईत आलेला व हरवलेला 18 वर्षांचा मोहम्मद अलीम अखेर सापडला आहे. अलीमला शोधण्यासाठी हैदराबाद पोलिसांच्या पथकाला शिवसैनिकांनी मोलाची मदत केली. हैदराबादचे पोलीस पथक अलीमचा शोध घेत असून त्यांना मदतीची गरज आहे, असा फोन शिवसेनेचे शाखाप्रमुख विजय मालुसरे यांना आला होता. त्यांनी आपले बंधू अंकुश मालुसरे यांच्या मदतीने काशिमीरा व भाईंदर पोलिसांशी संपर्क साधला. सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर मालुसरे बंधूंनी स्वतः हैदराबाद पोलिसांसोबत जाऊन अलीमला शोधण्यास मदत केली. जवळपास 4 तास शोध घेतल्यानंतर अलीम सापडला.