पश्चिम रेल्वेची सेवा आज रात्री विस्कळीत होणार; वसई ते वैतरणादरम्यान सहा तासांचा ब्लॉक

वसई ते वैतरणा स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री सहा तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची लोकलसेवा रात्री विस्कळीत होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळ, सिग्नल प्रणाली तसेच ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

अप जलद मार्गावर 23.55 ते 2.55 पर्यंत तर डाऊन जलद मार्गावर 1.30 ते 4.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे विरार-भरुच मेमू ट्रेन 15 मिनिटे उशीराने धावेल. ही मेमू विरार स्थानकातून आपली निर्धारीत वेळ 4.35 ऐवजी 4.50 वाजता सुटेल.