मुंबईत हुडहुडी कायम, सांताक्रुझ @17 अंश

cold-wave

राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच मुंबई शहर आणि उपनगरांत थंडीचा मुक्काम कायम राहिला आहे. रविवारी सांताक्रुझ येथे 17.4 अंश, तर कुलाब्यात 20.8 अंश तापमानाची नोंद झाली. मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी आल्हाददायक वातावरणात मॉर्निंगवॉकचा आनंद घेतला. वर्षीअखेरीपर्यंत थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याने मुंबईकरांकडून थर्टीफर्टचे नवनवे बेत आखले जात आहेत.

राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाआहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिह्यांमध्ये तापमानात विक्रमी घट झाली आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यातही थंडीची तीक्रता वाचालली आहे. याचदरम्यान, मुंबईकरांनाही आल्हाददायी वातावरण अनुभवाला मिळत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच यंदाच्या हंगामातील निच्चांकी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.