
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून जलवाहिनी वळवण्याचे काम सुरू असल्याने अंधेरी, विलेपार्ले भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठी करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
के पूर्व विभागातील बामणवाडा, विलेपार्ले (पूर्व) येथे मेट्रो मार्ग ७-अ च्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. पाणीपुरवठा यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम मंगळवार दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. परिणामी, पवई उच्च जलाशय -१ (PHLR-I) मधून होणारा पाणीपुरवठा मंगळवार दुपारी ४:०० वाजेपर्यंत बंद राहील, अशी माहिती महानगरपालिकेने पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे.
के पूर्व विभागातील प्रभावित होणारे परिसर
१) ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र),सहार गाव, सुतार पाखाडी (जलवाहिनी क्षेत्र)
(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५ ते सकाळी ८.१५) पाणीपुरवठा बंद राहील
२) मुलगाव डोंगरी, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज.
(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ ) पाणीपुरवठा बंद राहील
३) कबीर नगर, बामनवाडा, पारसीवाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, पी. अँड टी. वसाहत
(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ५.३० ) पाणीपुरवठा बंद राहील
४) चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोल औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग , कांती नगर
(नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ५.३० ) पाणीपुरवठा बंद राहील
दरम्यान, पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने के पूर्व विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


























































