500 चौरस फुटांच्या घरांना मुंबईत मालमत्ता कर नाही

सामना प्रतिनिधी। मुंबई

सामान्य मुंबईकरांसाठी अनेक उपाय राज्य सरकारने हाती घेतले आहेत. 2011 पर्यंतच्या प्रत्येक झोपडपट्टीधारकाला मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 500 चौ.फुटांपर्यंतच्या घरांना आता मुंबईत मालमत्ता कर लागणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी अंधेरी पूर्व येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते मुंबईत पहिल्यांदा रेल्वेसाठी प्रचंड मोठा निधी मोदी सरकारने दिला. मेट्रो, कोस्टल रोड, वाद्रे-वर्सोवा लिंक रोड अशी अनेक कामे जी केवळ कागदावर होती ती आता प्रत्यक्षात होत आहेत. आता वेळ आली आहे वाचाळवीरांना त्यांची जागा दाखवून देण्याची अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.