दुर्मिळ ‘रानकस्तूर’ पक्ष्याचे तरुणाने वाचवले प्राण

723

दुर्मीळ अशा ‘रानकस्तुर’ (नारिंगी डोक्याचा कस्तूर) या पक्ष्याचे मार्क अल्स्टेन्स नावाच्या तरुणाने प्राण वाचवले आहेत. मुंबईमधील जोगेश्वरी येथे ही घटना घडली. येथे रानकस्तुरावर कावळ्यांनी हल्ला केला होता. कावळ्याच्या हल्ल्यातून मार्क यांनी त्याची सुटका केली. कावळ्याच्या हल्ल्यात हा पक्षी गंभीर जखमी झाला होता. मार्कने त्याचे प्राण वाचून प्लॅण्ट ऍण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि अम्मा केअर फाऊंडेशनच्या कार्यकत्यांना याची सूचना देत या पक्ष्याला त्यांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, या पक्ष्यावर पशुवैद्यांनी उपचार केले असून त्याला पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती वनविभागालाही देण्यात आली आहे, अशी माहिती निशा कुंजू यांनी दिली. पक्षी उडण्याइतका सक्षम झाल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, अशी माहितीही कुंजू यांनी दिली.

7146dd0f-3c5b-497a-a3f2-0f3f78f856bd

रानकस्तुर हा पक्षी हिंदुस्थानी उपखंड आणि दक्षिणपूर्व आशियात आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी महाराष्ट्रातील आलिबाग, ताम्हिणी अशा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.

आपली प्रतिक्रिया द्या