‘अनवाणी संशोधकांच्या’ नजरेतून पाहा मुंबईतील संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मुंबई लोकल’ हा कार्यक्रम पुकारच्या ‘अनवाणी संशोधकांच्या’ नजरेतून केलेल मुंबई संबंधित संशोधनांचे प्रदर्शन आहे. या वर्षी पुकारच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६० तरुण ‘अनवाणी संशोधकांनी’ मुंबई शहर आणि लोकजीवनाशी निगडीत विविध विषयांवर संशोधन केलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनांचे सादरीकरण २३ जून रोजी टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, गोवंडी येथे आयोजित करण्यात आला आहे.