मुंबई-पुणे प्रवास महागणार,नव्या सरकारचे टोलवाढीचे गिफ्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने मुंबई आणि पुणेकरांना टोलवाढीची भेट दिली आहे. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल 18 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. पुढील वर्षीच्या 1 एप्रिलपासून वाहनचालकांना वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. मात्र हे दर 2030पर्यंत कायम ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अवजड वाहने डाव्या बाजूने चालवण्याचे आदेश आहेत. पण तरीही द्रुतगती महामार्गावर अवजड वाहने सर्रास उजव्या बाजूच्या लेनमधून जातात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. प्रवाशांना व वाहनचालकांना या महामार्गावर अपुऱ्या सुविधा आहेत. पण तरीही टोल वाढवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. यापूर्वी 1 एप्रिल 2020मध्ये टोल वाढवण्यात आला होता. त्यानंतर आता टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे.