दोन लाख रिक्षाचालकांनी अनुदानासाठी अर्ज केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड निर्बंधांच्या काळात रोजगाराअभावी हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांसाठी राज्य सरकारने 1500 रुपये अनुदान जाहीर केले आहे. 22 मेपासून परवानाधारक रिक्षाचालकांनी अनुदान मिळण्यासाठी आरटीओच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्ज आले आहेत. परिवहन विभागाने 90 हजार रुपयांचा निधी बँक खात्यावर वळता केला असल्याची माहिती डेप्युटी आरटीओ संदेश चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर राज्य सरकारने निर्बंध लागू केले होते. त्यामुळे रोजीरोटी बुडणाऱया सामाजिक घटकांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सामान्य रिक्षाचालकांना सरकारने प्रत्येकी 1500 रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान थेट परवानाधारक रिक्षाचालकांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. आतापर्यंत 90 हजार रुपयांचा निधी बँक खात्यावर जमा केला आहे. ज्यांची खाती तांत्रिक कारणांमुळे पिंवा इतर कारणांमुळे बंद आहेत त्यांना थेट रक्कम मिळण्यात अडचण येत आहे. ही रक्कम कुठेही वाया जाणार नाही. रिक्षा युनियन ही रक्कम त्यांना परत मिळवून देणार असल्याचे रिक्षाचालक-मालक सेनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले. रिक्षाचालकांना सरकारने शनिवार, 22 मेपासून अनुदान थेट खात्यावर जमा होण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. पहिल्या दिवशी संगणकीय प्रणाली ठप्प झाल्याने दुसऱया दिवशी सोमवारपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होऊन सायंकाळपर्यंत 22,048 रिक्षाचालकांचे अर्ज आले होते.