मुंबईत अपघाती मृत्यूचे प्रमाण घटले, गंभीर जखमी व जखमींच्या संख्येतही घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात गेल्या वर्षी झालेल्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण तसेच गंभीर जखमी व जखमी होण्याच्या संख्येतही घट झाल्याचे आकडेवारी सांगते. पाच वर्षांच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये अपघाती मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात असून केवळ 268 जणांना जीव गमवावा लागला आहे.

 गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये एकूण एक हजार 738 अपघात घडले. त्यापैकी 257 अपघातांत 268 जणांचा मृत्यू झाला. 1172 अपघातांत 1287 जण गंभीर जखमी झाले, तर 309 अपघातांमध्ये 343 जण जखमी झाले. अपघाताचे प्रमाण घटले असले तरी 268 जणांना जीव गमवावा लागला हेदेखील महत्त्वाचे आहे. दरम्यान, या वर्षी 24 जानेवारीपर्यंत शहरात 46 अपघात झाले. त्यापैकी 10 अपघातांत 12 जणांनी जीव गमावला. 32 अपघातांत 38 गंभीर जखमी झाले, तर पाच अपघातांमध्ये सहा जण किरकोळ जखमी झाले.