ओमप्रकाश गोयंका यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स हॉटेल या कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केल्याने गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले गोयंका यांची लवकरच सुटका होणार आहे.

रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपनीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले होते, परंतु लाखो गुंतवणूकदारांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. फसवणूक झालेल्या ग्राहकांमध्ये मुंबई-पुण्यातील गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून या फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 3 हजार 135 गुंतवणूकदारांनी 41 कोटी 3 लाख 20 हजार 968 रुपयांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.