मुंबई- कुर्ला परिसरातील गोदामाला भीषण आग, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातील खाडी नंबर 3 येथील एका गोदामाला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली आहे. या आगीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.