शहीद तुकाराम ओंबळे शिल्प परिसराचे सुशोभीकरण! – शिवसेनेचा पाठपुरावा

मुंबईवरील 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव चौक शिल्प परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी शिवसेनेकडून पाठपुरावा करण्यात आला.

सर पोचखानवाला रोडवरील तुकाराम ओंबळे चौक परिसरातील लाद्या तुटल्या होत्या. शिल्पाचा रंग काही ठिकाणी उडाला होता. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उप विभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी जी /दक्षिणचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. मुंबईवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील दहशदवादी अजमल कसाब याला गिरगाव चौपाटी येथे जिवंत पकडताना वरळी पोलीस वसाहती मध्ये राहणारे रहिवाशी पोलीस उप निरीक्षक तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्या स्मृती भावी पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी तत्कालीन नगरसेवक स्वर्गीय मधुकर दळवी यांच्या पाठपुराव्याने शहीद तुकाराम ओंबळे यांचे शिल्प चौकात बसविण्यात आले आहे. या शिल्पाच्या परिसरातील लाद्या तुटलेल्या अवस्थेत होत्या तसेच शिल्पाची रंगरंगोटी करणे गरजेचे होते. ही बाब स्थानिक रहिवाशी संतोष कोयेंडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अभिजित पाटील यांनी पाठपुरावा केला.

आपली प्रतिक्रिया द्या