
शिवसैनिकांसह उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांचा भव्य मार्गदर्शन मेळावा वडाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वडाळा विधानसभेवर डौलाने भगवा फडकावण्याचा निर्धार करण्यात आला. माजी महापौर, महिला विभाग संघटक आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू आणि अंबादास दानवे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर, नगरसेविका प्रीती पाटणकर, उर्मिला पांचाळ, सचिन पडवळ, विधानसभा संघटक अनिल घोसाळकर, सुनीता आयरे, उपविभागप्रमुख विलास राणे, राकेश देशमुख, माधुरी मांजरेकर, रचना अग्रवाल, सुशीला गाडे, विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर, युवासेना सहसचिव मयूर कांबळे, विभाग अधिकारी रितेश सावंत आदी उपस्थित होते. प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले.



























































