
शीव पश्चिम येथील साधना हायस्कूल समोरील चौकाचे नामकरण ज्येष्ठ अभिनेत्री उमा प्रकाश भेंडे चौक असे करण्यात येणार आहे. या चौकाचा लोकार्पण सोहळा गुरूवार, 4 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. चौकाच्या नामकरणासाठी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी प्रयत्न केले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे, प्रसाद भेंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत.



























































