भायखळा जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड टेलिफोन’, शनिवारपासून सेवेला सुरुवात

कारागृहाच्या चार भिंतीआड गेल्यानंतर एकाकी पडणाऱ्या कैद्यांना आता  कुटुंबीय, नातेवाईक, मित्र तसेच वकिलांशी थेट बोलता येणार आहे. त्याकरिता कारागृह प्रशासनाने भायखळा जिल्हा कारागृहात ‘स्मार्ट कार्ड टेलिफोन’ सेवा आजपासून कार्यान्वित केली आहे.

स्मार्टकार्ड फोन सुविधेमुळे कैद्यांना प्रत्येक आठवडय़ाला तीनवेळा प्रत्येकी सहा मिनिटांसाठी बोलण्याची संधी मिळणार आहे. या सुविधेमुळे कैद्यांना कुटुंबीय, नातेवाईक, मित्र तसेच वकिलांशी बोलता येणार आहे. या सुविधेमुळे आत राहूनही बोलता येणार असल्याने कैद्यांची मनस्थिती बिघडण्यापासून रोखण्यास व त्यांच्यात सकारात्मकता वाढण्यास मदत होणार आहे. कारागृह विभागाचे अपर महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज स्मार्ट कार्ड पह्न सुविधा भायखळा कारागृहात कार्यान्वित करण्यात आली.