एस.टी.च्या ताफ्यात विना एसी स्लीपर कोच बसेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताफ्यात नवीन विना एसी स्लीपर कोच बसेस दाखल झाल्या असून राज्यातील 16 मार्गांवर या बसेस धावणार आहेत. मंगळवारी एस.टी.च्या परळ येथील आगारात परळ-भटवाडी (पाटगाव) या मार्गावर धावणाऱया पहिल्या बसचे अनावरण प्रवासी रोहित धेंडे आणि एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते पार पडले.

रात्रीचा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवासी स्लीपर कोच बसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एस.टी. महामंडळाने 30 पुश बॅक आसने व 15 प्रशस्त स्लीपर कोच (बर्थ) असलेली बस आणली आहे. या बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हींसाठी) निम आराम म्हणजे हिरकणी बसच्या तिकीट दराइतका असणार आहे.

चालक केबिनमध्ये अनाऊसिंग सिस्टम. प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा. मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच.

प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रीडिंग लॅम्प. प्रत्येक स्लीपर कोचला एक कोच फॅन हवेच्या दाबावर उघडझाप होणारा प्रवासी दरवाजा. पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक.

या मार्गावर बस धावणार

परेल-भटवाडी (पाटगाव)

मुंबई सेंट्रल -मिरज

मुंबई सेंट्रल -तारकपूर

मुंबई सेंट्रल -शेवगाव

मुंबई सेंट्रल -हिंगोली

बोरिवली-देवगड

बोरिवली-देवाचे गोठणे

ठाणे-अक्कलकोट

पुणे-नागपूर

पुणे-गणपतीपुळे

पुणे (शिवाजीनगर)-साक्री

कोल्हापूर-नाशिक

कोल्हापूर-बीड

कोल्हापूर-हैदराबाद