
दिवसभरात चढ आणि उतार पाहायला मिळाल्यानंतर दिवसअखेर शेअर बाजार वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 409 अंकांनी वधारून 80,567 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 135 अंक वाढून 24,715 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी इन्पहसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिवर, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरले.