
उच्च शिक्षणासाठी जॉर्जियामध्ये गेलेल्या मुंबईतील सिद्धेश शेट्टी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजून उघड होऊ शकलेले नाही. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनेच्या वृत्ताला सोमवारी दुजोरा दिला.
सिद्धेश शेट्टी जॉर्जियामध्ये इतर तीन सहकाऱयांसोबत राहत होता. तो ज्या इमारतीत राहायचा, त्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधून त्याने उडी मारली. त्याचा जागीच मृत्यू झाला. तो फार्माच्या तृतीय वर्षात शिकत होता. मागील काही महिन्यांपासून त्याला नैराश्याने ग्रासले होते. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
























































