
मुबंई व उपनगरात मंगळवार रात्रीपासून सीएनजीच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सीएनजी 87 रुपये प्रती किलो मिळणार आहे.
पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. सिलिंडरचे दरही वाढतच चालले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांसोबतच गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होताना दिसत होती. अखेर आज हे दर अडीच रुपयाने कमी करण्यात आले आहेत.






























































