
सामना ऑनलाईन मुंबई/ठाणे
- गेल्या 12 तासापासून बदलापूर वांगणीदरम्याान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले

- मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर ओसरला, लोकल सेवा उशिराने
- पुणे- सिंहगड मार्गावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ झाड कोसळले. मदतकार्य सुरू

- पुण्यात झाड कोसळलं
- डोंबिवलीला पावसाचा फटका, 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत
- सकाळी 8.06 मिनिटांनी भरती आहे. समुद्रात 3.36 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता
- हवाई वाहतूकीलाही पावसाचा फटका, मुंबई विमानतळावरील 7 ते 8 उड्डाणे रद्द
7 flights have been cancelled, go-arounds-8 & 9 have been diverted at Mumbai Airport. #MumbaiRains
— ANI (@ANI) July 27, 2019
- गेल्या 3 तासातील पावसाची आकडेवारी : कुलाबा – 20.84 मिमी, सीएसएमटी-18.4 मिमी, भायखळा 28.45 मिमी परळ – 30.46 मिमी, मुलुंड – 31.98 मिमी, वांद्रे 36.32मिमी , अंधेरी- 39.11 मिमी, बोरिवली- 32.74 मिमी, चेंबूर- 54.86 मिमी, पवई- 56.38 मिमी
- मुंबई उपनगरात गेल्या 24 तासात 150 ते 180 मिमी पाऊस तर दक्षिण मुंबईत 50 ते 100 मिमी पाऊस पडला
Heavy to very heavy rainfall in the suburbs in last 24 Hrs at 7 am, stations reporting rainfall 150-180 mm rainfall in suburbs. City side around 50 – 100 mm.
Santacruz 192 mm
Colaba 73 mmHeavy showers in the early morning hrs are on in Suburbs and to continue.
Please TC pic.twitter.com/C2NIqgzUee— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2019
- पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा
- मध्य रेल्वेची लोकल वाहतूक किमान 30 मिनिटे उशिराने सुरू आहे
- मुंबई-गोवा महामार्ग रात्रीपासून ठप्प
- पावसामुळे कराड-चिपळूण मार्ग 4 तासांपासून पूर्णपणे ठप्प
- 2000 हून अधिक प्रवासी एक्सप्रेसमध्ये अडकले
- वांगणी स्थानकात रात्रीपासून महालक्ष्मी एक्सप्रेस खोळंबली आहे
Mahalaxmi express stuck near Vangani since night due to water log, pl send rescue team
— Ymoharir (@Ymoharir1) July 27, 2019
- वांगणी स्थानकात ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचले आहे
- मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या अधिकारात शनिवारी सुट्टी जाहीर करण्याची मुभा
- मुंबईत शनिवारीही मुसळधार पावसाचा इशारा
As per IMD forecast received at 2 am, intermittent rain with heavy to very heavy rainfall at a few places expected in the city and suburbs #MumbaiRainsLiveUpdates #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 27, 2019
- बदलापूर ते कर्जत-खोपोली वाहतूक पूर्णपणे ठप्प
- वांगणी स्थानकात मात्र रुळांवरील पाण्याची पातळी वाढत चालली आहे.
- बदलापूर स्थानकातील पाणी ओसरले
- मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात




























































