
मुंबईतील दहा स्थानकांचा होणार कायापाल उपनरीय रेल्वे मार्गावरील स्थानक म्हटले की प्रवाशांची जीवघेणी गर्दी, अस्ताव्यस्तपणा आणि गरजेनुसार लांबवलेले फलाट हेच चित्र डोळय़ासमोर उभे राहते. वर्षानुवर्षे बकालपणा आलेल्या मुंबईतील दहा स्थानकांचा कायापालट होणार आहे. ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत रेल्वेने मुंबई विभागातील 15 स्थानकांचा मेकओव्हर करण्यात येणार असून त्यामध्ये भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी अशा 11 स्थानकांचा समावेश आहे. स्थानकाच्या दर्शनी भागाची आकर्षक सजावट, स्थानकाबाहेर पार्पिंग व्यवस्था करणे, पादचारी पूल उभारणे, बसण्यासाठी विशेष व्यवस्था, प्रशस्त तिकीट काऊंटर अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज 40 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र सध्या स्थानकात असलेल्या सोयीसुविधांचा विचार करता त्या अपुऱया पडत आहे. अरुंद जिन्यांमुळे अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्याची दखल घेत मार्च 2024 पर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 15 स्थानकांचा कायापालट करण्यात येणार असून त्याची सुरुवात लवकरच होणार आहे. त्यानुसार स्थानकाचे एण्ट्री पॉइंट प्रशस्त करण्यात येणार असून पार्पिंग व्यवस्था करणे, सरकते जिने उभारणे, स्थानकात आणि प्रत्येक फलाटावर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी असन व्यवस्था करणे, फलाटावर संपूर्ण छत घालणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात संबंधित स्थानक चकाचक दिसणार आहे.
आकर्षक डिझाईन तयार
रेल्वे स्थानकांच्या डिजाईनमध्ये एक सारखे पणा येऊ नये म्हणून ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत कायापालट होणाऱया स्थानकांची डिझाईन स्वतंत्र कन्सल्टंटकडून तयार करून घेतले आहे.
ही आहेत स्थानके
भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजुरमार्ग, वडाळा, स्टॅण्डहर्स्ट रोड ही मुंबईची तर दिवा, मुंब्रा, टिटवाळा, शहाड, इगतपुरी ही मुंबईबाहेरील स्थानके आहेत.























































