साताऱयातील दोन राजांमधील वाद पवारांनी मिटवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात दिलजमाई करण्यात या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अखेर यश आले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

साताऱयातील आमदार शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातून विस्तव जात नव्हता. मागील वर्षी साताऱयात या दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे होती. साताऱयातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यास काही कार्यकर्त्यांनी विरोधही केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी मुंबईत या दोन्ही नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ आदी उपस्थित होते.

वाद मिटला

या बैठकीत राज्यातल्या मतदारसंघांचा आढावा घेताना या दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यात यश आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी एकदिलाने काम करण्याची ग्वाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येणाऱया निवडणुकीत सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची ग्वाही या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांना दिल्याचे सांगण्यात येते.