एम. फिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ias-exams-bta1
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

एम. फिल आणि पीएचडी करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे. एम. फिल, पीएचडी, प्रवेश परीक्षा (पेट)साठी यापुढे यूजीसीचा 70:30चा पेपर पॅटर्न अवलंबविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. तसेच डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पेट परीक्षेचा निकालही महाविद्यालयांनी 70:30 पॅटर्ननुसार जाहीर करावा अशा सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाने डिसेंबरमध्ये घेतलेली पेट परीक्षा सरसकट 100 गुणांची (लेखी परीक्षा) घेतली. या परीक्षेवेळी यूसीजीच्या 70:30 या पेपर पॅटर्नचे पालन करण्यात आले नाही. सरसकट 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आल्याने ही परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. 70:30 पॅटर्नमध्ये 70 गुणांची लेखी तर 30 (व्हायवा) गुणांची तोंडी परीक्षा असते. विद्यापीठ आता डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पेट परीक्षेचा निकालही 70:30 पॅटर्ननुसारच जाहीर करणार आहे.