
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महानगरपालिकेला आज (21 जुलै) रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचे वितरण गुरुवारी (22 जुलै) दिवसभरात सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेला, कोविशिल्डचे 50 हजार तर कोवॅक्सिनचे 11 हजार 200 असे एकूण 61 हजार 200 डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे गुरुवारी दिवसभरात वितरण केले जाईल. या कारणाने गुरुवारी नागरिकांना लस देता येणार नाही. तथापि, शुक्रवार मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.



























































