
विलेपार्ले येथील रूपाली बाळेकुंद्री हिने प्रतिष्ठेचा मिसेस इंडिया युनिव्हर्स हा किताब पटकावला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित मिसेस एक्सक्लुझिव्ह क्लासिक ब्युटी इंडिया स्पर्धेत तिने या पुरस्कारावर नाव कोरले आहे.
रूपाली ही पेशाने इंजिनीअर आहे. आजवर अमेरिका जपान आणि युरोपमध्ये नोकरीनिमित्त तिने वास्तव्य केले आहे. या स्पर्धेत तिने आपल्या बुद्धिमत्तेने जजेसची मनं जिंकली आहेत. रूपाली आता मिसेस युनिव्हर्स इंटरनॅशनल स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करेल. देशभरातून तब्बल 6500 स्पर्धकांतून अंतिम 50 जणांची या स्पर्धेसाठी या निवड झाली होती. त्यातील 15 स्पर्धक मेगा फायनलसाठी पात्र ठरले. या मेगा फायनलमधून 5 विजेते निवडण्यात आले. या स्पर्धेत मिसेस इंडिया क्लासिक ग्लोब कीर्ती सिंग (दिल्ली), मिसेस इंडिया क्लासिक ब्युटी वर्ल्ड – तसा डैजी (दिल्ली) ठरल्या आहेत. प्रथम उपविजेती – सोनिया फर्नांडिस (महाराष्ट्र) तर द्वितीय उपविजेती बीना पांडे (उत्तर प्रदेश) ठरल्या आहेत.


























































