
मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी कोलकात्याच्या मातब्बर एससी ईस्ट बंगालवर 3-0 असा सफाईदार विजय मिळवला. इंग्लंडचा 36 वर्षीय फॉरवर्ड अॅडम ली फाँड्रे याने दोन गोलांसह या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पेनचा 30 वर्षीय मध्यरक्षक हर्नान सँटाना याने एक शानदार गोल केला. मुंबई सिटीचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय असून त्यांनी एक सामना गमावला आहे. त्यांचे सहा गुण झाले. याबरोबरच मुंबई सिटीने गुणतक्त्यात आघाडी घेतली.
एटीके मोहन बागानप्रमाणेच त्यांचे सहा गुण झाले. मुंबईचा 3 (4-1) आणि एटीकेएमबीचा 3-0 (3) असा गोलफरकही समान आहे, पण मुंबईने गोल जास्त केले आहेत. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पहिल्या सत्रात मुंबई सिटीकडे एका गोलची आघाडी होती. मग दुस्रया सत्रात दहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत मुंबई सिटीने पकड भक्कम केली.
स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाया मुंबई सिटीने रॉबी फाऊलवर यांच्या ईस्ट बंगालवर दमदार खेळाच्या जोरावर वर्चस्व राखले. सामन्याच्या प्रारंभीच कर्णधार डॅनिएल फॉक्स याला दुखापत झाली. त्यामुळे संघाच्या रचनेत करावा लागलेला बदल ईस्ट बंगालसाठी प्रतिपूल ठरला. त्यांच्या संघाला अखेरपर्यंत लय अशी गवसलीच नाही. ईस्ट बंगलासाठी हा निकाल निराशाजनक ठरला.
सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या विजयासह पहिल्या गोलचीही त्यांची प्रतिक्षा लांबली. त्यांचे गुणांचे खाते अद्याप उघडले नसून तळातील अकरावा क्रमांक कायम राहिला. अर्थात ही आकडेवारी मंगळवार रात्रीपर्यंतची आहे.





























































