वरळीत आज 102 वे रक्तदान शिबिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाल्यानंतर वरळीतील शिवसेना शाखेत दर महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. त्यानुसार आज 17 जून रोजी 102 वे रक्तदान शिबिर सायंकाळी 5 ते 8 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. वरळी येथील शाखेत हे शिबिर पार पडणार असून इच्छुक रक्तदात्यांनी 9821581860 या क्रमांकावर आयोजक नगरसेवक अरविंद भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.