झूमकारद्वारे ‘झूमकार मोबिलिटी सर्व्हिसेस’ची सुरुवात

440

झूमकारने दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, ट्रक आणि बसेस या वाहनांच्या सर्व श्रेणींमध्ये सॉफ्टवेअर आधारीत प्लॅटफॉर्म सेवा प्रदान करण्यासाठी झूमकार मोबिलिटी सर्व्हिसेस (झेडएमएस) सुरू करण्याची घोषणा केली. अंतर्गत इंधनाच्या तसेच इलेक्ट्रिक वाहने या दोन्हींसाठी झेडएमएस काम करेल. ते पूर्णपणे हार्डवेअर विरहित आहे. झेडएमएसच्या लाँचिंगनंतर झूमकार आधुनिक आणि टेक स्टॅकची सुविधा देईल, जे ऑपरेटिंग खर्च कमी करणे, सुरक्षा वाढवणे, वाहनाचे उत्पन्न वाढवणे तसेच ग्राहकांची संख्या वाढवणे यावर भर देईल.

झेडएमएसचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील खासगी मालकीची ड्रायव्हर स्कोरिंग मेकॅनिझम. हे एक एआय पॉवर्ड मेकॅनिझम असून त्यात मशीन लर्निंग क्षमता आहे. याद्वारे वाहनाच्या आरोग्याच्या सद्यस्थितीसह ग्राहकाच्या रिअल-टाइम ड्रायव्हिंग वर्तनावरही लक्ष ठेवता येते. ड्रायव्हिंगचा दर्जा सुधारण्यासाठी ड्रायव्हर स्कोअर वेगाने सूचना प्रदान करतो. त्यानंतर एकत्रिकृत सॉफ्टवेअर सोल्यूशन 0-100 च्या स्केलवर ड्रायव्हरला रेटिंग करते. ड्रायव्हरच्या कामगिरीची पातळी वेळोवेळी दर्शवण्यासाठी मदत करते. एकंदरीतच झेडएमएस ड्रायव्हर स्कोअरिंग सिस्टिम आणि त्यासंबंधित वर्तणूक सुधारणेच्या यंत्रणेद्वारे मासिक ऑपरेटिंग खर्च 25 ते 30 टक्के वाचवते.

आपली प्रतिक्रिया द्या