
सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम आणि इंटरमीजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांनी देशभरात चमकदार कामगिरी केली आहे.
सीए इंटरमीजिएट परीक्षेत देशात अकोल्याच्या युग कारिया आणि भाईंदर येथील यज्ञ चांडक यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर तिसऱया क्रमांकावर मुंबईचा हिरेश काशीरामका आहे. सीए अंतिम परीक्षेत मुंबईच्या किरण सिंग हिने आणि नवी मुंबईच्या घीलमान अन्सारी या दोघांनी संयुक्तपणे देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. सीए अंतिम (फायनल) गट 1 ची परीक्षा 74 हजार 887 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 20 हजार 479 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.