मुन्नी नाही तर आता झालाय मुन्ना बदनाम! कसा? पाहा व्हिडीओ

927

मलाईका अरोराच्या लटक्या झटक्यांनी लोकप्रिय झालेलं मुन्नी बदनाम हुई हे गाणं सर्वांना आठवत असेलच. दबंगमधल्या या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. पण आता मुन्नी नाही तर मुन्ना बदनाम झाला आहे.

सलमानच्या आगामी दबंग 3 या चित्रपटातील एक नवीन गाणं प्रदर्शित झालं असून त्याचे बोल मुन्ना बदनाम हुआ असे आहेत. या गाण्याचा टीझर काही काळापूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता हे गाणं प्रदर्शित झालं असून मुन्ना बदनाम हुआ म्हणत प्रभुदेवा आणि सलमानने धमाल उडवून दिली आहे. गंमत म्हणजे यात प्रभुदेवा नाचताना दिसत असला तरी या गाण्याची कोरिओग्राफी मात्र वैभवी मर्चंट हिने केली आहे.

हे गाणं बादशाह, कमाल खान आणि ममता शर्मा यांनी गायलं असून साजिद वाजिद यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. गाण्याचे बोल दानिश सबरी आणि बादशाह यांनी लिहिले आहेत.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या