अहमदपूरमध्ये एकाची हत्या

अहमदपूर येथील निजवंते नगरच्या मोकळ्या मैदानात एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली. तालुक्यातील थोडगा येथील रहिवाशी असलेल्या गौतम पंढरी कांबळे (वय 55) यांचा मृतदेह थोडगा रोड जवळील निजवंते नगरच्या मोकळ्या मैदानात सोमवारी सकाळी 8.30 वाजता आढळून आला. हॉटेलमधील बसण्याच्या लाकडी बाकड्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण केल्याच्या जखमा आहेत. गौतम अहमदपूर येथील भागीरथी लॉजमध्ये कामाला होता. या घटनेची तक्रार मृताचा शशिकांत कांबळे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात दिली. अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संशयित आरोपी इसा रहमतुला तांबोळी (रा. दर्गापूरा गल्ली अहमदपूर) व दुसरा संशियीत आरोपी हावगी नारायण कल्याणे (रा. खेडकर वाडी, तालुका लोहा) यांना ताब्यांत घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या