मुरुड येथून अल्पवयीन मुलीस पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील मौजे मुरुड येथून अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली.

फिर्यादीची मुलगी ही मुरुड येथील शाळेत इयत्ता 7 वी च्या वर्गात शिकत होती. सकाळी ती घरातून शाळेत गेली, दुपारी जेवणासाठी ती घरी आली होती. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ती घरातून शाळेसाठी म्हणून गेली. परंतु शाळा सुटल्यानंतरही ती घरी परत आलीच नाही. अज्ञात व्यक्तिने तिला पळवून नेले. मुरुड गावात आणि परिसरात तसेच नातेवाईकांकडेही तिचा शोध घेण्यात आला परंतु ती सापडली नाही. मुरुड पोलीसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.