
मुरुड पोलीस ठाण्याचा प्रभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक किनोद तांबोळी यांचा मृतदेह खांदेश्वर पुलाजवळ रेल्वे टॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी साडेचार वाजता ही घटना उघडकीस आली. गेल्या दोन दिवसांपासून आजारपणाच्या रजेवर असलेले तांबोळी यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून पुढील तपास पनवेल रेल्वे पोलीस करत आहेत.
तांबोळी हे 2011च्या दरम्यान परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्तांच्या पनकेल कार्यालयात पोलीस हकालदार होते. त्यानंतर खाते अंतर्गत परीक्षा देऊन सहायक पोलीस निरीक्षकपदापर्यंत पोहोचले होते. सध्या ते मुरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आजारी असल्याचे कारण देत ते शुक्रवारपासून दोन दिकसांच्या रजेकर गेले होते,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली. तांबोळी यांना लोकलची धडक बसल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचे रेल्वे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

































































