
केंद्र सरकारने शेतीसंदर्भात तीन विधेयक पारित केले आहेत. हे कायदे शेतकरी हिताच्या विरोधात असून पंजाबमध्ये शेतकर्यांनी आंदोलन पुकारले आहे. पंजाबमध्ये शेतकरी केंद्र सरकारविरोधात उपाशी पोटी आंदोलन करत होते. तेव्हा मुस्लिम समाजातील काही बांधवानी त्यांच्या जेवणाची सोय केली. त्याच एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.
पंजाबमध्ये शेतकरी केंद्र सरकारविरोधात उपाशी पोटी आंदोलन करत होते. तेव्हा मुस्लिम समाजातील काही बांधवानी त्यांच्या जेवण्याची सोय केली. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. #FarmersProtest #FarmersBill pic.twitter.com/UBC6WGM0bD
— Saamana (@Saamanaonline) October 5, 2020
पंजाबमध्ये एका ठिकाणी शेतकरी आंदोलन करताना मुस्लिम बांधव त्यांना जेवण वाढत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकर्यांनी मुस्लिम बांधवांची प्रशंसा केली आहे.
शेतकरी विधेयकाविरोधात देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर विरोधी पक्ष शेतकर्यांना भडकावत असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. या विधेयकाविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंह यांनी खेती बचाव आंदोअल्न केले होते तसेच ट्रॅक्टर रॅलीही काढली होती.

























































