स्वादिष्ट मटन खिमा गुजिया.

3341

नॉनवेज खवय्यांना  नेहमीच काहीतरी चटपटीत आणि झणझणीत खायला आवडते. पण बऱ्याचवेळा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाही येतो. म्हणून अशा खवय्यांसाठी आम्ही खास मटन खिमा गुजियाची रेसिपी आणली आहे.

खिम्यासाठी साहित्य-एक वाटी मटन खीमा, दोन चमचे बारीक कापलेला लसूण, दोन चमचे बारीक कापलेला कांदा,एक लहान चमचा जिरेपूड, एक चमचा चिरलेली पुदीना पाने, चवीनुसार मीठ, एक लहान चमचा चूर्ण मिरपूड, एक लहान चमचा लिंबाचा रस

कृती

1. बारिक चिरलेल्या चिकनला दही, लिंबाचा रस, लाल तिखट, आलं लसून पेस्ट, दही लावून मॅरिनेट करा. आणि 20 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा.

2.एका कढईमध्ये कांदे आणि लसूण तेल टाकून परतून घ्या. त्यात मटन खीमा टाकून तो तांबुस रंग येइपर्यंत शिजवा.

3. मटन पूर्णपणे शिजल्यानंतर त्यात जिरेपूड, चिरलेला पुदीना आणि मीठ आणि मिरपूड घाला आणि थंड होऊ द्या.

4. मोठ्या भांड्यात मैदा आणि चवीनुसार मीठ घ्या.मैद्यावर गरम तूप घाला. दूध घालून पीठ मळून घ्या आणि ओलसर कपड्याने झाकून ३० मिनिटे विश्रांती घ्या.

5. आता लहान आकाराचे पीठाचे गोळे तयार करुन घ्या आणि ते लाटुन घ्या व करंजीमध्ये जसे पुरण भरतात तसे मिश्रण त्यात भरून ते दुमडून बंद करुन घ्या.

6. एका कढ़ईमध्ये तेल गरम करा व मटनाच्या करंज्या मध्ये आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळुन घ्या.

7. तेल खेचुन घेण्याकरिता त्या करंज्या कागदावर ठेवा आणि सर्व्ह करा.

 

आपली प्रतिक्रिया द्या