
शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते. त्यामुळे अनेकजण सुरक्षित असलेल्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. काही म्युचुअल फंडने जबरदस्त परतावा दिला आहे. म्युचुएल फंडमधील गुंतवणुकीमुळे शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळतो. तसेच जोखीमही कमी होते. तसेच दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचे चांगले फायदे होतात.
पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्चुनिटीज फंड- डायरेक्ट प्लान-ग्रोथ प्लॅनने (PGIM India Midcap Opportunities Fund – Direct Plan-Growth) गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. व्हॅल्यू रिसर्चने या फंडला पाच स्टारची रेटिंग दिली आहे. या मिडकॅपची स्थापना 2 डिसेंबर 2013 मध्ये झाली होती.
या फंडने एकरकमी गुंतवणूकीवर 355 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. तर या काळात फंडने सरासरी 17.55 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. एकरकमी गुंतवणूक केलेल्यांना 32.50 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. तर या काळात निफ्टी 50 ने गुतंवणूकदारांना 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गुतंवणुकीवर मिळणाऱ्या चांगल्या परताव्यामुळे हा फंड गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरत आहे.
या फंडमध्ये 1 हजार रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. गेल्या वर्षात या फंडच्या एसआयपीने 6.85 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर फंडने 12.98 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. गेल्या दोन वर्षात या फंडने 56 टक्क्याचा रिटर्न दिला आहे. तर पाच वर्षांच्या काळात या फंडने 104.50 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
म्युचुअल फंड कॅल्युकेटरद्वारे गणना केली असता दर महिन्याला 10 हजाराच्या एसआयपी गुतंवणूक केली असता वर्षभरात त्याचे 1.02 लाख होतात. तसेच दीर्घ मुदतीसाठी गुतंवणूक असल्यास चक्रवाढ व्याजाने चांगला परतावा मिळतो. तर तीन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 6.49 लाख रुपे होतात. तर पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यास त्याचे 11.98 लाख होतात. त्यामुळे जबरदस्त परतावा देणारा हा फंड ठरत आहे. मात्र, शेअर बाजार किंवा म्युचुअल फंडमध्ये गुतंवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.


























































