Lok Sabha Election 2024 : भाजपला मोठा धक्का, राजीनामा देत खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. बिहारच्या मुजफ्फरपुरमधील भाजपचे विद्यमान खासदार अजय निषाद यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मुजफ्फरपूर मतदारसंघासाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर पक्षाचे नेते अजय निशाद यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज त्यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. मुजफ्फरपूरचे अजय निषाद दोन वेळा खासदार राहिलेले आहेत.

मुजफ्फरपूरचे भाजप खासदार अजय निषाद यांनी मंगळवारी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर करत राजीनामा जाहीर केला. त्यात ते म्हणाले, “आदरणीय @JPNadda जी, @BJP4India च्या विश्वासघाताने धक्का बसला आहे, मी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.