म्यानमारमध्ये 89 प्रवाशांचा जीव टांगणीला, गिअर फेल झाल्याने विमानाचे नाकावर लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । यंगून

गिअर फेल झाल्याने व पुढची चाकं अडकून राहिल्याने ‘म्यानमार एअर लाईन’च्या विमानाचे नाकावर घसरत जात एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानातील 89 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

‘म्यानमार एअर लाईन’चे UB-103 या विमानात 89 प्रवासी होते. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, रविवारी सकाळी नऊ वाजता मंडाले शहरातील विमानतळावर विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे गिअर फेल झाल्याने पुढची चाकं आत अडकून राहिली. पायलटने संपूर्ण प्रयत्न करूनही विमानाचे गिअर अडकून राहिली. तसेच पायलटने कॉम्प्यूटर तंत्रज्ञानाच्या बळावर मॅन्यूअली गिअर खोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील निष्फळ ठरला. त्यामुळे मागच्या चाकांच्या आणि नाकाच्या बळावर विमानाचे लँडिंग करण्यात आल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली होती. परंतु सुदैवाने प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांना कोणताही दुखापत झाली नाही.