मायरा- साईराजला ‘देवबाप्पा’ची ओढ

‘माझी तुझी रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मायरा वायकुळ आणि ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ रील्समुळे सध्या चर्चेत आलेला साईराज केंद्रे या चिमुकल्यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेले ‘देवबाप्पा’ हे नवीन गाणे नुकतेच भेटीला आले आहे. एका दिवसातच या गाण्याला एक लाखाहून अधिक ह्युज मिळाले आहेत.

‘ओढ तुझी लागली साऱ्या जगाला…लवकर ये बाप्पा तू घराला’ असे गाण्याचे बोल असून दिया वाडकर, हर्ष भोईर आणि स्नेहा महाडिक यांनी हे गीत गायले आहे. प्रवीण कोळी आणि योगिता कोळी हे गीतकार व संगीतकार आहेत. कोळीवूड प्रोडक्शन निर्मित या गाण्याचे निर्माते, दिग्दर्शक प्रवीण कोळी आहेत. अलिबागसारख्या नयनरम्य ङ्गिकाणी हे गाणे चित्रित झाले असून ‘एका बाप्पाच्या मूर्तीमुळे जर सर्व समाज एकत्र येत असेल तर बाप्पा तू खरंच लाखात एक आहे’ असा महत्त्वपूर्ण संदेश या गाण्यातून दिला आहे. संकल्पना, कथा आणि स्क्रीन प्ले संदेश कोळी, अक्षय गोरे यांचे आहे. अंकिता राऊत, भरत जाधव, नलिनी मुंबईकर, दिशा गिरी, जयेश चव्हाण, भावेश चव्हाण, विक्रांत मुंबईकर यांच्याही भूमिका आहेत. प्रवीण कोळी यांच्या यूटय़ूब चॅनलवर गाणे पाहता येईल.