नागाळा -सिदुर मार्गे बस सेवा सुरू करण्यात यावी, युवासेनेची मागणी

461

चंद्रपूर जिल्ह्यातील सिदूर येथील नागरिकांना विशेषतः महिला व चंद्रपूर येथे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज शाळा-महाविद्यालय सुटल्यावर चंद्रपूर ते सिदूर गावाला पोहोचण्याकरिता कसलेही साधन व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना घुगुस पासून चार किलोमीटरपर्यंत पायी जावं लागत आहे. सायंकाळची वेळ असल्याकारणाने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असून तेथील विद्यार्थी -नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर बस सेवा सुरु करण्यात यावी याकरिता युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना ज़िल्हा प्रमुख संदिप गिर्हे, महानगर प्रमुख यांच्यासह शिवसैनिक व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या