दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हडोळती

अहमदपूर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने या परिसरात अल्प पाऊस झाला. त्यामुळे या अल्प पाण्यावर जेवढी पिके तरली तेवढेच अल्प उत्पादन झाले. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

चारा पाणि समस्या आतापासूनच भीषण झाली आहे पावसाचे आणखी सात महिने शिल्लक असताना विहीर आणि बोअर यांनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी गंभीर होत चालला आहे . खरिपाचे अत्यल्प उत्पादन रब्बीचीही तीच स्थिती आहे डिसेंबर संपत आला तरीही रब्बी पेरणी घटली आहे . जनावराच्या चारा पाणी प्रश्नावर प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत .

ऊसाच्या एफ आर पी चा मुद्दा ऐरणीवर दरवर्षी शेतकरी आणि साखर कारखाने यांच्यात एफ आर पी वरून वाद होतात यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजा मुळे ऊसाची लागवड वाढली पण पर्जन्यमान घटल्यामुळे उत्पादनात व वजनात घट दिसून येते आहे . ऊसाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. मजूर व ऊस वाहतूक करणारा ड्रायव्हर शेतकऱ्याची लुट करत असून ऊसतोड करणारे मजूर शेतकऱ्याकडून एकरी दोन हजार रुपये व गाडी चालक ड्रायव्हर 300 रूपये प्रमाणे भत्ता घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची लुट चालू आहे .

या वर्षी कारखान्यानी तीन टप्प्यात एफ आर पी देण्याचे ठरले आहे. पण ही रक्कम एक रक्कमी मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे . पावसाअभावी ऊसावर करप्या ,लोकरी मावा आदी रोगाने हमला केल्याने ऊसाला अडचण ठरत आहे. कमी पायामुळे उसाची वाढ खुटली असून त्यामूळे उतारात घसरण येत आहे घातलेला खर्च निघत नसल्याचे शेतकरी खंत व्यक्त करत आहेत .त्यामुळे शेतकरी या दुष्काळामुळे दुहेरी संकटात सापडला आहे.