एसटी बसची आणि कारची समोरासमोर धडक; 3 जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी शिवारामध्ये एसटी बस व चार चाकी गाडी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाले आहे

अक्कलकोट येथून नगर कडे येणारी बस ही अंबिलवाडी शिवारामध्ये आले असता समोरून येणाऱ्या त्यासाठीच झायलो या गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये झायलो गाडीचा चक्काचूर झाला आहे या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहे तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गाडीतील जे जखमी आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी आणले जात आहे