सहलीला जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहलीस जाण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग येउन तालुक्यातील पोखरी येथील सतिश जगन्नाथ घुले वय 19 या तरूणाने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सतिश घुले हा संगमनेर येथील फिरोदीया कॉलेजमध्ये बी कॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होता. महाविदयालयाची सहल जाणार असल्याने फी भरण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी त्याने वडीलांकडे केली होती. घुले यांच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने दोन हजार रूपये जमा करणे त्यांच्या पुढे आव्हण होते. तरीही वडीलांनी त्यास 1 हजार रूपये पाचशे रूपये दिले होते. उर्वरीत 500 रूपये कसे उभे करणार याची सतिश यास चिंता होती. दररोज सकाळी कॉजेलला जाणारा सतिश 24 डिसेंबर रोजी कॉलेजला गेला नाही. त्याचे कारण विचारले असता अजारी असल्याचे त्याने सांगितले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे आई वडील मोल मजुरीसाठी घराबाहेर पडल्या नंतर काही वेळाने सतिशही घराबाहेर पडला, तो बराच वेळ घरी परतला नाही. त्यामुळे घरी असलेल्या त्याच्या आजीने सतिश याच्या आईस फोन करून माहीती दिली असता सतिश याचे आई वडील घरी आले. गावात शोध घेउनही तो आढळून आला नाही. रात्र होउनही तो न परतल्याने नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. कोणत्याही नातेवाईकाकडे तो गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्रीपासूनच त्याच शोध घेण्यात येत होता.

तिन दिवस शोध घेउनही तो आढळून न आल्याने सतिशचे आई वडील चिंतेत होते. शनिवारी सकाळी घुले यांचे मेहुणे प्रातः विधीसाठी गेले असता गावातील प्रभू खैरे यांनी कृषी विभागाच्या योजनेतून खोदलेल्या विहीरीत त्यांनी डोकावले. त्यांना सतिश याचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर सहा. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी येउन पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. टाकळीढोकेश्‍वर येथील ग्रामिण रूग्णालतयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.