वादग्रस्त पोस्टर व्हायरल करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाल किल्ल्याच्या फोटोमधील तिरंगा ध्वज काढून त्याजागी पाकिस्तानी ध्वज टाकून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

अदनान आयाज सय्यद (वय 21, रा. कोतवाली पोलीस ठाण्यासमोर, नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून, कुणाल सुनील भंडारी (वय 28, रा. आनंदनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

नगर शहरातील एका तरुणाने लाल किल्ल्यावर असलेला झेंडा हटवून त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडवकल्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर टाकल्याचे कुणाल भंडारी यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने हालचाल करत अदनान सय्यद याला ताब्यात घेतले.