नगरमधील तिसरा रूग्णही कोरोनामुक्त; 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह

335

नगर जिल्ह्यात आढळलेला कोरोनाचा तिसरा रूग्णही कोरोनामुक्त झाला आहे. या रूग्णाच्या 14 दिवसानंतर झालेल्या दोन्ही तपासणीत हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रूग्णाला शुक्रवारी घरी सोडण्यात येणार आहे.

यापूर्वी दोन रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता तिसर्‍या रूग्णाचाही अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. या तिसर्‍या रूग्णाची 14 दिवसानंतरची पहिली तपासणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने दुसर्‍या तपासणीसाठी स्त्राव नमुना पुण्याला पाठविला होता. त्याचा अहवाल शुक्रवारी मिळाला असून अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या रूग्णाला शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. कोरोनावर मात करून या आजारातून बरी होणारी ही जिल्ह्यातील तिसरी व्यक्ती आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारपर्यंत 122 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत. यापैकी 103 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये तिसर्‍या करोनाबाधित व्यक्तीच्या अहवालाचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या