पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची सरकारला मागणी

298

अपुर्‍या पावसामुळे खरीप हंगाम साधला नाही. शेतातील थोडे फार पिके परतिच्या अतिवृष्टीने काढता आली नाहीत. रब्बी हंगामातील ज्वारी शेतात डोलदारपणे उभी होती. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यातच गेल्या पाच दिवसांपासून परिसरात जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

परिसरात सावरगावला ज्वारीचे कोठार समजले जाते. या भागात ज्वारी खुपच चांगली येते. खरिप हंगाम अपुर्‍या पावसामुळे वाया गेला परतिचा मान्सून या भागात चांगला झाल्याने वेळेवर ज्वारी पिकांची पेरणी झाली. पीकही जोमदार आले पण पाच दिवसांपासून सुटलेल्या जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणचे पीक भुईसपाट झाले आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या